मानस,
गझल आवडली. साऱ्या द्विपदी मस्त, त्यातही छप्पर आणि दोर विशेष वाटले. मतला दोन विरुद्ध अर्थांनी वाचला व दोन्ही अर्थांनी आवडला. घायाळ हरणी जीवदान मागत असून शिकारी तरीही निर्दयपणे बाण नेम धरून तिच्यावर रोखतो आहे असा एक; आणि घायाळ हरिणी मृत्यूरूपी मुक्ती मागते आहे पण शिकाऱ्याने तरीही बाण रोखलेला ( रोखून धरलेला, अडवलेला) आहे, तो वेदनांतक बाण सोडत नाही हा दुसरा.

अवांतर : कैस की क़ैस?