सर ,

प्रथमतः व्यक्तिगत मार्गदर्शनाच्या व I'm OK - You're OK  या पुस्तकाच्या सूचनेसाठी मनः पूर्वक धन्यवाद. या पूर्वी 'वरदा' प्रकाशनची ( भावे ) किंवा 'साधना'  प्रकाशनाची ( यदुनाथ थत्ते ) 'पुढे व्हा' सारखी उद्बोधक पुस्तके वाचलेली आहेत. आपण सुचविलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने त्याला इंग्रजी वाचनाची जोड मिळून जाईल.

वयाचा आपण दिलेला सल्ला पुन्हा असा प्रसंग उद्भवल्यास अंमलात आणण्याचा प्रयत्न करीन.

तुमच्या उत्तरातून मला या संकल्पनांमधील नेमकेपणा समजून घेण्यासाठी बरीच माहिती मिळाली.