कारण त्यांना आपल्या कुवतीची पुर्ण कल्पना असते, शिवाय ही माणसे पुढिल अडचणींचा विचार करुनच आपली दिशा ठरवतात.
मला वाटतं यात नकारात्मक विचार असे काही नाहीत. उलट आपल्या कुवतीची जाणीव ठेवून आणि पुढील अडचणींचा दूरदृष्टीने विचार करून योग्य निर्णय घेणे हीसुद्धा होकारात्मक(सकारात्मक) विचारसरणीच वाटते.
म्हणजे आपली कुवत जरी कमी असली आणि त्यामुळे भविष्यात काही अडचणी आल्यात तर त्यातूनही मार्ग काढण्याची तयारी करून पुढे पाऊल टाकणे हे तर होकारात्मक(सकारात्मक) विचारसरणीचे उत्तम उदाहरण वाटते. आणि मला वाटतं की आपण मांडलीये त्या 'होकारात्मक(सकारात्मक)' विचारसरणीचेच लोक यशस्वी होतात.
अर्थात हे माझे मत आहे. आपल्याला वेगळे काही म्हणायचे असल्यास तसे सांगून या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे.