नोस्टाल्जिक लेख आवडला. फक्त द्रोण पत्रावळींनी पुढील काळातही आपले अस्तित्व असेच जोपासावे व त्यांना भरभरून लोकाधार मिळावा हीच मंगलकामना! हे पटले व आवडले नाही. श्रावणातली पत्री, आपट्याची पाने, पाडव्याला कडुलिंबाची पाने आणि अत्यंत निरर्थक आणि कालबाह्य असे ते आंब्याचे तोरण यासाठी बेदरकारपणे ओरबाडली जाणारी झाडे पाहिली की हळहळ वाटते. 'जुने ते सोने' हा विचारही आपण जुना म्हणून सोन्यासारखा जपतो आहे. दळवींच्या 'तात्या' पासून कानीकपाळी ओरडणाऱ्या सगळ्या निसर्गप्रेमींचा आवाज बहिऱ्या कानांवरच पडतो आहे, हेच अधोरेखित करणारे हे वाक्य वाटते. 'मला काय त्याचे? ' किंवा 'एवढ्याशा पानांनी काय तो तुमच्या पर्यावरणावर वगैरे काय फरक पडणार आहे? ' असा यावर युक्तिवाद असेल तर शब्दच खुंटले!