सज्जनगडावरही प्रसाद असाच पत्रावळीवर वाढला जातो, पंगत सुरू होण्यापूर्वी चढ्या धीरगंभीर स्वरात 'वदनी कवळ घेता'चा दुमदुमणारा घोष वातावरण विलक्षण नादमय करतो. त्या भोजनाला शब्दशः भक्तिभावाने केलेले प्रसादग्रहण म्हणता येईल. द्रोण पत्रावळीच्या जोडीबरोबर सारवलेली जमीन आणि 'वदनी कवळ घेता' देखील आठवते. आमच्या घरी चौदा वर्षे अनंताची पूजा होत असे, त्याचीही प्रकर्षाने आठवण झाली.
अरुंधती, फारच सुरेख आठवणी जागृत केल्यात. मांडणीही छान. धन्यवाद.