भूषणजी, चैतन्यजी, 'मन'-तिघांनाही, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल.
(जवळीक) असा शब्द आहे ना? - जवळिक तसेच जवळीक हे दोन्ही शब्द वापरले जातात. यात मला थोडा फरक वाटतो तो असा : ऱ्हस्व 'ळि' शेजार, निकटता दाखविणारा तर 'ळी' घसट दाखविणारा.
(बरसून जाणं, उतावळं देणं.... ) कसं वाटतं?? - बऱ्याच वेळा मला या प्रकारातल्या रचना शतपावली करताना सुचतात. त्यात जो ओघ असतो, तो एका शब्दात व्यक्त होत असतो. त्यामुळे असे दोन शब्द आपोआपच गाळले जातात. आणि बरसून जाणं यात व्यक्त होणारा विरह येथे अपेक्षित नाही. आपण केलेल्या सूचनांबद्दल आभारी आहे. लों. अ.