भूषणराव, सकारात्मकतेची आपण केलेली (आपणच केली आहे ना? ) व्याख्या पर्फेक्ट आहे.
माझ्या मते, सकारात्मक, नकारात्मक ह्याचा विचार हा स्पेक्ट्रम किंवा नंबर लाईन सारखा करावा (पॉझिटिव्ह इंफिनिटी टू निगेटिव्ह इंफिनिटी) म्हणजे अतिशय सकारत्मक ते पूर्ण निराशावादी. आणि आपण नक्की कुठल्या एनर्जी लेवल वर आहोत हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. त्या गोष्टी कोणत्या हे शोधून काढलं पाहिजे. त्यामध्ये अगदी स्वतःचा मूळचा स्वभाव, आपली रास ते आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासण्याची क्षमता ह्या गोष्टी असू शकतील. (ही फक्त माझी थिअरी आहे, ह्याला कुठल्याही प्रयोगांची वगैरे जोड नाही. )
तज्ञ मनोगतींनी मार्गदर्शन केले तर बरे होईल.