मी तसा आहे सुखी ह्या राऊळी पण,
एक नाम्या अन तुक्याची वाण आहे

वा ! छान शेर आहे.

बाकीचे सुटे सुटे मिसरे पण चांगले आले आहेत. उदा :-

"आज कोणाचा गळा देवा नशीबी? " / दुर्दशा झाली अशी ह्या छप्पराची! (आभाळ हैराण व्हायचे असल्यास "दुर्दशा झाली कशी ह्या छप्पराची " यायला हवे की काय असे वाटले. )

काही काही शब्द  वृत्तात बसवण्यासाठी  मागे पुढे झाल्यासारखे वाटतात.

उदा :-

कैसच्या पाउलखुणा सांभाळ बाबा (इथे बाबा च्या ऐवजी काहीही , संवादात्मक) (मुद्रा वगैरे खूपच क्लिष्ट लागेल असे वाटले , इतरांचे मत वेगळे असू शकते) अशा पद्धतीने जास्त सुटसुटीत झाले असते का असा विचार करतो आहे.

तसेच काहीसे

चूर झाला त्यास का माहीत नव्हते ? असे केल्याने "हे " चा वापर (जो  सानी मिसऱ्यात दोनदा आलेलाच  आहे ) टाळता आला असता का असाही विचार करतो आहे.

चंद्र कोठे गावतो काव्यास माझ्या?
कल्पनेचे तोकडे उड्डाण आहे!

आवडला. सहज आलाय . (जरी "गावतो" हा शब्द संपूर्ण गझल मधल्या इतर लहज्याशी जुळत नाही असे माझे मत)

मला मतला सोडून सर्व कल्पना खूप आवडल्या. आणि वर उल्लेखलेले दोन शेर जे खूपच सहज आले आहेत.

धन्यवाद.