वा वा वा! तुमच्या लेखाने कोकणातल्या जुन्या सुग्रास भोजन पंक्तिंच्या आठवणी जाग्या झाल्या!!
पंक्तींच्या जेवणाचा अविभाज्य हिस्सा ठरलेल्या ह्या पर्यावरणपूरक (तेव्हा असे शब्दही माहीत नव्हते) पत्रावळी - द्रोण....
सध्य परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या किंवा प्लास्टिक (मेलामाईन वगैरे)च्या ताटवाट्यांपेक्षा द्रोण पत्रावळी नक्कीच जास्त पर्यावरणपूरक होत्या. लोखंड खनिजाच्या उत्खननापासून ते स्टीलच्या वस्तूच्या उत्पादनापर्यंत संपूर्ण उत्पादन शृंखलेत पर्यावरणाची अपरिमीत आणि कधीही न भरून निघणारीच हानी होते. (यामुळेच हे व्यवसाय भारत, चीन अशा पर्यावरणा विषयी बेफिकिरी असणाऱ्या देशांमध्ये झपाट्याने वाढतायत.) महादिव्य प्लास्टिकबद्दल तर काही न बोलणंच इष्ट...