मागे बोस्टनच्या एका उपनगरातल्या एका दुकानात पत्रावळी अत्यंत आकर्षक वेष्टनात बांधून विक्रीस ठेवलेल्या (शंभर-दीडशेच्या गठ्ठ्यांत असाव्यात) पाहिल्या होत्या त्याची आठवण झाली. बोस्टनमध्ये पत्रावळी कोण आणि कशासाठी आयात करीत असेल असा प्रश्नही मनात येऊन गेला.