प्रस्तुत लेखाचे शीर्षक हे तो लेख ज्या चित्रपटाचे परीक्षण आहे, त्या चित्रपटातील एका गाण्याचा थेट उल्लेख आहे. त्याचे भाषांतर केल्यास चित्रपटाचा संदर्भ निघून गेल्यामुळे असे भाषांतर निरर्थक ठरावे.

'नफ़रत करने वालों के' हा एका गाण्याचा सरळ उल्लेख म्हणजेच एका प्रकारे नामोल्लेख किंवा विशेषनामाप्रमाणे आहे. विशेषनामांचे भाषांतर करू नये असे वाटते. नाही तर उद्या उदाहरणादाखल अशा प्रकारे महाभारताचे कोणी जर इंग्रजीत भाषांतर केले, तर त्यात 'चित्रवीर्य' आणि 'विचित्रवीर्य' यांऐवजी 'पिक्चरसीमेन' आणि 'वीयर्डसीमेन' वाचायला कसेसेच वाटावे. प्रस्तुत लेखाच्या शीर्षकाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू व्हावे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)