'नफ़रत करने वालों को' या शीर्षकाला प्रस्तुत संदर्भात केवळ ते 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील गाणे आहे आणि प्रस्तुत लेख 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटाबद्दल आहे म्हणून अर्थ आहे. या शीर्षकाचे मराठीकरण केल्यास त्याचा 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटाशी किंवा प्रस्तुत लेखाच्या विषयाशी काहीही संबंध राहणार नाही. (प्रस्तुत लेख हा 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटासंबंधी आहे, द्वेष करणाऱ्यांबद्दल नव्हे. त्यामुळे त्या संदर्भात या लेखाच्या शीर्षकात प्रस्तुत गाण्याच्या शब्दांशी मतलब आहे, अर्थाशी नव्हे.)
समांतर उदाहरण घ्यायचे झाल्यास उदाहरणादाखल जर कोणी 'शोले' या चित्रपटाचे समीक्षण लिहावयाचे ठरवले ('जॉनी मेरा नाम' या चित्रपटाबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे त्यातील अधिक उदाहरणे देऊ शकत नाही. क्षमस्व.), आणि काही कारणास्तव या परीक्षणाचे शीर्षक 'मेहबूबा, मेहबूबा' किंवा 'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!' असे ठेवावयाचे ठरवले, तर अशा शीर्षकांचे 'प्रेमिके, प्रेमिके' किंवा 'वसंती, या कुत्र्यांसमोर नाचू नकोस!' असे मराठीकरण निरर्थक ठरावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)