'देव'भावा'चा भुकेला' हा श्लेष उत्तम, गमतीशीर आहे. तथापि या लेखाला ते शीर्षक अजिबात समर्पक नाही.
असे पाहा, लेख जर 'विजय आनंदच्या दिग्दर्शनाखाली देवानंदने केलेली कामे' अशासारख्या विषयावर असता, तर त्याला हे शीर्षक चालले असते. वर झालेल्या चर्चेप्रमाणे 'नफरत करनेवालोंके' या शीर्षकाला एक विवक्षित संदर्भ आहे. या शीर्षकाचे भाषांतर वगैरे करणे यातून मूळ गंमत निघून जाते.
मराठीबद्दल प्रेम म्हणजे इतर भाषांबद्दल द्वेष असाच बऱ्याच लोकांचा समज असतो. 'हिंग्लीश', 'पिंग्लिश' 'मिंग्लिश' वगैरे प्रकार बालीशपणाचे असले तरी प्रत्येक गोष्टीचे मारून मुटकून मराठीकरण करण्याचा (सावरकरी? ) प्रयत्न तितकाच बालीशपणाचा आहे. मलाही मराठी लेखांना, नाटकांना हिंदी इंग्लिश नावे दिलेली अजिबात आवडत नाहीत. या वाक्यात 'इंग्लिश' हा शब्द किती सहजपणाने आला आहे. याचा अर्थ लेखिकेला 'इंग्रजी' हा शब्द माहिती नाही असा होतो का?
कोणत्याही भाषेबाबतचा असा दुराग्रहच भाषेच्या विकासातला मोठा अडथळा असतो, असे माझे मत आहे. पण या विषयावर अनेकवेळा तावातावाने चर्चा झालेली असल्याने पुन्हा विषयांतर नको. मूळ लेखनात अशा सुधारणा सुचवण्याआधी लेखकाला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे, ही विनंती. जुनीच उपमा परत वापरतो, झेब्रा आवडला नाही, तर तसे स्पष्ट म्हणून त्याला हाकलून द्या; हा कसला पट्ट्यापट्ट्याचा उंट असे म्हणू नका!
बाय द वे (किंवा रस्त्याच्या बाजूबाजूने  ! ) टग्या यांना ''मलाही मराठी लेखांना, नाटकांना हिंदी इंग्लिश नावे दिलेली अजिबात आवडत नाहीत.' याच्या बरोबर उलटे म्हणायचे असावे, असे वाटते!