असे लेख वाचून आपली चूक नसताना मस्तवालपणे आपल्या दुचाक्या उचलणाऱ्या आणि आपल्या चारचाक्यांना जॅमर लावणाऱ्या गुटखाळ, उद्धटश्रेष्ठ, संस्कारहीन, पुढारीपुष्ट, देशाच्या आधारस्तंभाचे वगैरे स्मरण होते आणि रक्तदाब अंमळसा वाढतो. 'पाखरु' हा शब्द खरोखर वापरला असेल तर आहे नाही तेवढी शक्ती एकवटून त्या नरपुंगवाच्या थोबाडीत द्यायला पाहिजे होती, असे वाटते. अशी असंख्य भांडणे करून मी 'सारांश' मधल्या 'आय डोंट सी एनी होप फॉर धिस कंट्री' म्हणणाऱ्या अनुपम खेरच्या भूमिकेत आलो आहे!