मराठी नांव गुळवेल असेच आहे. बहुधा या वनस्पतीचे कंद, त्यांची भुकटी वापरतात. काष्टौषधी विकणाऱ्या दुकानात अशी भुकटी सहज मिळू शकते. चिकित्साप्रभाकर ग्रंथात दिलेल्या माहितीप्रमाणे गरुडवेल, गुडुची, गरोळ आदी याच वनस्पतीची नांवे आहेत. या वनस्पतीचे गुणधर्म : उष्णवीर्य, कडू, तुरट, तिखट, मधुर, रसाय्न, ग्राहक (मल धरून ठेवणारी), बल्य, अग्निदीपक, हृद्य, आयुःप्रद, लघु. उपयोग : ज्वर, दाह, तृषा, ओकारी, रक्तदोष, वायू, प्रमेह, पांडुरोग (अनिमिया), कृमी, भ्रम, त्रिदोष, आव, कास, कामला, कुष्ट, वातरक्त, रक्ती मूळव्याध, कंडू, विसर्प, पित्त, मेद, कफ यांवर उपयोगी.
तुपाशी : वातनाशक, साखरेबरोबर : पित्तनाशक, मधाशी : कफनाशक, एरंडेलात : वातरक्तनाशक, सुंठीबरोबर : आमवातनाशक.
गुळवेल सत्त्वसुद्धा बाजारात मिळते.