वेदश्री,

तुमचा हा अनुभव वाचून केवळ संताप झाला. आपली काही चूक नसतानाही अश्याप्रकारे भुर्दंड पडल्याने मनस्तापच जास्त होतो.

तरी तुम्ही त्या 'साहेबाला' चांगलंच धारेवर धरलं हे बरं झालं. गाडीच्या डिकीत कागदपत्रे आहेत पण गाडी जप्त केलेली असल्याने ती कागदपत्रे दाखवता येत नाहीत म्हणून त्याचे ३०० रुपये!!! हा निर्लज्जपणाचा कळसच आहे असे वाटते.

हे सगळे साहेब, आधी १०००+ रुपये वगैरे अशी भली मोठी रक्कम दंड आहे असे सांगून शेवटी नेहमीच १५०-२०० रुपयांवर कसे तयार होतात? तेव्हा 'योग्य दंड' जमा करून घेणे हे त्यांचं कर्तव्य कसे विसरतात? देव जाणे खरंच असेल का, पण या १५०-२०० रुपयांच्या पावतीच्या वैधतेवर पण मला शंकाच येते...