सध्या स्वाईन फ्ल्यू ची जोरात चर्चा चालू आहे. पूर्वी कधीतरी आलेल्या प्लेग सारखी घबराट पसरली आहे. मला सहज एक गोष्ट वाटली. कोणी डॉक्टर याचा खुलासा करू शकेल का? हा आजार जर श्वासाचा आहे. फुप्फुसांवर परिणाम करतो . तर एक उपाय करून बघता येण्यासारखा आहे. तो म्हणजे व्हिक्स ची वाफ घेणे. किंवा नुसती वाफ घेणे. कारण त्यामुळे फुप्फुसात गेलेले जंतू किंवा विषाणू मरतील. बाकी स्वच्छतेची काळजी जशी घ्यायला सांगितली आहे तशी घेत रहायचे. साध्या सर्दीत आपण वाफ घेतोच की नाही? कारण असे म्हणतात की यात जंतू संसर्ग झाल्यापासून लक्षात यायला ८ दिवस लागतात. तो पर्यंत तो दुसऱ्याला होतो. पण आपल्याला बाकी काही कळले नाही तरी सर्दी काही एकदम होत नाही. आधी नाक सुरसुरते किंवा घसा खवखवतो. त्याच वेळी वाफ घ्यायला सुरूवात केली तर? कोणी डॉक्टरांनी याचा खुलासा करावा. थोडी शांतता मिळेल. धन्यवाद.