सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.

संजोपराव,

अग्गदी २४ टक्के सोनं बोललात तुम्ही!

संजोपराव आणि स्वाती दिनेश,

'पाखरू'बद्दल म्हणाल तर त्या माणसाला थोबाडीत मारण्यासाठी का होईना करावा लागला असता तितकाही स्पर्श करायला मला किळस आली खरेतर.

स्मिता१,

पावतीची वैधता कशी काय पडताळून पहायची? हे नाही ध्यानात आले माझ्या. १०० रुपये सरकारी खजान्यात आणि ५० रुपये वाहतुकीस अडथळा होतो म्हणून दंड अशा त्या पावत्या आहेत. कोणाच्या वाहतुकीस अडथळा होत होता माझ्याबाबतीत कोण जाणे..

मऊमाऊ,

गट्टू म्हणजे पायी चालणाऱ्यांसाठी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा जे छोटे रस्ते बनवले जातात त्यासाठी वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असे सिमेंटचे ठोकळे वापरले जातात.. त्यांनाच गट्टू म्हणतात.

कुशाग्र,

खरंय हो. एकतर गाड्यांची संख्या इतकी वाढली आहे की पार्कींगची जागा कमी पडते. त्यातही हे लोक अर्धा गट्टू - तोही पेव्हमेंटचा सोडणार नाही म्हटले तर मग जगायचं कसं माणसाने?