इतका संताप करून घेणं ही आपल्या तब्येतीस चांगलं नाही .. मी असा संताप न करून घेता एकच युक्ती केली होती..
मी पुण्यात तुकाराम पादुका चौकात घोलेरोड वरून डावीकडे वळले .. आता त्या सिग्नल ला लेफ्ट ग्रीन ऍरो होता आणि मी वळले आणि एखाद्या क्षणामध्ये तो रेड झाला,माझी काही ही चूक नसताना थांबवलं की एका पोलिसानं "ओ ताऽऽऽई.. सिग्नल तोडलात " म्हणत..
त्याचा तंबाखूचा तोबरा भरेपर्यंत मी शांतपणे गाडीवर बसून राहिले .. तो मला म्हणाला पावती बूक संपलं आहे १०० रू. द्या आणि मोकळं करा.. मनात म्हटलं वा रे बेट्या.. मी पर्स मधून शांतपणे १ ,५, १० अशा  नोटी काढून हवेत नाचवल्या व माझ्याकडे पैसे आहेत का ते चेक करते आहे म्हणून त्याला सांगितलं .. पूर्ण पाच मिनिटे टाईमपास करत काढली .. तितक्यात माझ्या मागे ट्रॅफिक अडू लागला ..पोलिस जाम घाबरला.. मला म्हणे अहोऽऽऽ नसले तर जाऊ द्याऽऽऽ लोकांसमोर पैसे दाखवू नका होऽऽऽ ताई.. मी म्हटले माझी काहीच चूक नव्हती तरी तुम्ही थांबवलेत तर त्याला आता मी काय करायचे..

तो टरकला आणि मला म्हणे हो जा तुम्हीऽऽ काही प्रॉब्लेम नाही.. म्हणलं नक्की नाऽऽ बघा नाहीतर मी शोधते पैसे पर्स मध्ये असतील अहोऽऽ माझ्या..
त्यानी नाय तुम्ही निघा म्हणत स्टॅंडवर लावून घेतलेली माझी गाडी काढून स्टार्ट ही करून दिली  

पण एक मात्र आहे अमेरिकेत पोलिस ने थांबवल्यावर गाडी एका साईड ला घ्यावीच लागते आणि ते येईपर्यंत हात स्टेअरिंग वर ठेवून हालचाल न करता बसून राहावे लागते.. नियम म्हणजे नियम..