वरील सर्व प्रतिसादांशी सहमत आहेच. ' पाखरू ' शी शी काय ही बोलायची पद्धत आहे, संताप आला वाचून. तर प्रत्यक्ष तुझ्या कानावर पडले तेव्हा तर खरेच दोन कानशिलात भडकाव्याश्या वाटल्या असतील. तुझी पाठ थोपटावी तितकी थोडीच आहे. बरे केलेस. यांना वाटते की लोक तमाशा होईल व कायदा नीटसा कळत नसल्याने, कुठे नादी लागा म्हणून यांच्या मनमानीला वैतागून बळी पडतील. पण असे अनेक जणांनी आरे ला कारे केले तरच काहीतरी (१-२% लोक बदलतील-वठणीवर येतील - ही निव्वळ आशा आहे. ) घडेल. पुढच्या वेळी कोणाला तरी बकरा बनवताना किमान विचार करतील. पुन्हा एकदा अभिनंदन!