बाय द वे (किंवा रस्त्याच्या बाजूबाजूने! ) टग्या यांना ''मलाही मराठी लेखांना, नाटकांना हिंदी इंग्लिश नावे दिलेली अजिबात आवडत नाहीत. ' याच्या बरोबर उलटे म्हणायचे असावे, असे वाटते!
'काहीसे बरोबर' एवढ्यासाठी, की 'बरोबर' म्हटले तर 'याच्या बरोबर उलटे'चा (माझ्या मते चुकीचा) अर्थ 'मला मराठी लेखांना, नाटकांना हिंदी किंवा इंग्लिश नावे दिलेली आवडतात' असा घेतला जाऊ शकतो. अर्थातच मला तशा प्रकारचे काहीही म्हणायचे नाही.
माझे म्हणणे एवढेच, की मराठी लेखांना, नाटकांना वगैरे मराठी नावे देता आली तर उत्तमच, परंतु तो प्राथमिक निकष असू नये. समर्पकता हा निकष सर्वप्रथम असावा, आणि त्यातूनही मराठीतूनच शीर्षक देता आले, तर सोन्याहूनही पिवळे! मुद्दाम अमराठी शीर्षक देऊ नये, परंतु एखादे शीर्षक समर्पक असल्यास केवळ ते मराठी नाही म्हणून न देण्याच्या किंवा बदलण्याच्या किंवा मराठीतून देण्याच्या अट्टाहासाचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही. अशा एखाद्या शीर्षकाने (जोवर समर्पक आहे तोवर) मराठीवर कोणतेही आभाळ कोसळत नाही, आणि ते बदलल्याने मराठीचा कोणताही फायदा होत नाही. (असे निदान मला तरी वाटते.)
बाकी, (गेलाबाजार, 'वसंती, या कुत्र्यांसमोर नाचू नकोस!' या प्रकारच्या शीर्षकांच्या तुलनेत हजारपटीने चांगले आणि किमानपक्षी ससंदर्भ आहे. द्या टाळी!) या वाक्यातून ओसंडणारा उपहास चाणाक्षांच्या नजरेतून निसटला नसावा, अशी आशा आहे. (मात्र वाक्यातील श्लेष उत्तम आहे हे कधीही मान्य. )
बाय द वे (किंवा रस्त्याच्या बाजूबाजूने! )
'रस्त्याच्या बाजूबाजूने'पेक्षा 'रस्त्याच्या कडेकडेने' असे भाषांतर अधिक समर्पक ठरावे. (अर्थात, आमच्यासारख्या मध्यममार्गींना हा अतिरेकी मार्ग पसंत पडण्यासारखा नाही, पण तरीही.)