प्रीति,

लेख नेहमीप्रमाणेच छानच झालाय. हा प्रतिसाद देण्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदी अस्मिताची मावशी सांगत होती की अमेरिकेत त्यांच्या शेजारी एक मराठी कुटुंबच राहतं. आपलं राष्ट्रगीत कधी ओझरतं जरी ऐकू आलं तरी त्या शेजारणीचे लगेच डोळे भरून येतात! बीजिंग ऑलिंपिक्समध्ये नेमबाजीच्या स्पर्धेत अभिनव बिंद्रा शेवटच्या तीनांत पोहोचल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकताच पुढचा तास-दीड तास ती टी. व्ही. समोर बसून होती... म्हणे की जर तो जिंकला तर आपल्या राष्ट्रगीताची धून ऐकायला मिळेल! हे वाचून माझ्या अंगावर शहारा आला.

कॉलेजमध्ये असेपर्यंत झेंडावंदनाच्या वेळी असणारे इतर कार्यक्रम जरी कंटाळवाणे असलेत तरी राष्ट्रगीत सुरू झाले की एक वेगळाच उत्साह वाटायचा आणि ते चालू असताना अगदी भारावून जायचे.

आता बंगलोरमध्ये राहून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करताना झेंडावंदनाची संधीच मिळत नाही .  पण यावेळी परेड ग्राउंड वर किंवा कमीतकमी जवळच्या एखाद्या शाळेत जायचा विचार करतेय.