दोन वर्षांपूर्वी नियमितपणे शब्दकोडी देण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला होता, त्यावेळी जेथल्यातेथे सोडवता येण्यासारख्या शब्दकोड्याचा हा प्रयोग एक वर्षभर नेमाने पुरा करता येतो का हे पाहावे, असा विचार त्यामागे होता. मात्र एक वर्ष होऊन गेल्यावरही सदस्यांच्या उत्साही सहभागामुळे आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रयोग दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत अखंड आणि नियमितपणे चालू शकला. मिलिंद फणसे, मीरा फाटक, विभव गोरे, मेघना नरवणे, सागर लिमये, जीवन जिज्ञासा, वरदा, ॐ, चित्त, मुग्धा रिसबूड, अमित. कुलकर्णी, श्रीकांत सरमळकर, मी दादरकर, गजानन गंजीवाले, हर्षवर्धन गोविलकर, कृष्णकुमार द. जोशी, जालसर्वज्ञ, पराग जोगळेकर इत्यादींनी आपणहोऊन भाग घेऊन ह्या प्रयोगास हातभार लावला त्याचा ह्या संकल्पपूर्तीत मोठा वाटा आहे, हे नमूद करावेसे वाटते. (जर काही सदस्यांची नावे ह्यात नजरचुकीने राहिलेली असली तर कृपया लक्ष वेधावे, म्हणजे दुरुस्ती करता येईल. )
ह्यापुढेही सदस्यांनी आपण रचलेली शब्दकोडी, नुसते शब्द किंवा शोधसूत्रे प्रशासनास पूर्वीप्रमाणेच कळवत राहावे. पुढील वर्षभर वेगवेगळ्या विभागातील ऊर्ध्वश्रेणीकरण बेतलेले असल्याने येत्या भविष्यकाळात हा प्रयोग नैमित्तिक स्तरावर चालू ठेवण्याचा प्रयत्न राहील.