तुम्ही चांगला केलात पण मी म्हणेन तुम्ही १५० सुद्धा द्यायचे नाहीत... किती प्रचंड मनस्ताप आणि संताप होतो त्याचे हे उदाहरण बघा.
माझा भाउ दुचाकी वरून जात होता.आता एक वाहतुक नियंत्रक काय विचार करतो ....
१. ह्म्म्म तरुण पोरगा दिसतोय..
२. हिरो होंडा सीबीजी ?? गुड गुड >:)...
३. थांबवा याला....
त्याने थांबवले.
परवाना दाखव..
दाखवला..
पीऊसी दाखव..
दाखवल..
नोंद पत्र दाखव..
सर आता माझ्याकडे नाही आहे
कुटून चोरलीस गाडी ?( माझा भाउ म्हणजे अतिशय करेक्ट प्रकारचा माणूस आहे. तो असल काही वावग ऐकून घेत नाही)
ठीक आहे. दंड करा भरतो .. ..
आता समोरून एका दुचाकी वरून ३ लोक जात आहेत.. चालक वाहतूक नियंत्रकच समोर थांबून ४-६ गुजगोष्टी करतोय..
आणि सुमित (माझा भाउ) उभा आहे वाट बघत कधी ह्याचा समपतय ते बघत. त्यांचा तो मित्र सोहळा १०-१२ मिनटानी संपला.
नियंत्रकः मग काय करायच?
सुमितः नियमाप्रमाणे माझ्याकडे नोंदपत्र नही आहे पण समज देऊन सोडलत तर बर होईल.
नियंत्रक : अरे पण चोरली असेल तर काय करायचा ते विचारतोय.
सुमितः मी तुम्हाला पावतीशिवाय एक पैसाही देणार नाही. तेव्हा वायफळ बोलून माझा वेळ घालवु नका. पावती द्या मी दंड भरतो.
नियंत्रकः (अरे तुरे वर ) ये.. ही घे पावती आणि पोलीस स्टेशन ला जाउन भरून ये. गाडी एथेच राहील.
(हे संभाषन खुप म्हणजे खुप कमी लिहिल आहे मी. संपुर्ण १५-२० मिनीट तरी होतिल)
सुमित थोडा चालत , थोडा तीन चाकी ने असा धडपडत प्रचंड उन्हातून जाउन पैसे भरून बाहेर पडला. तर त्याचा एकंदर चेहरा आणि राग बघून स्टेशन मधला एक जण म्हनाला चल मी तुला सोडतो तिथे पर्यंत... त्याने विचारल काय झाला म्हनून.. सांगितल्यावर तो म्हनतो की असू दे होत अस कधी कधी ( हा मात्र खरच न भुतो न भविश्यती असा हवाल्दार होता ).त्याने तिथे सोडल्यावर तो नियंत्रक पहील्यान्दा थोडा चपापला पण हवाल्दार आणि सुमित ची काही ओळख नाही म्हनल्यावर परत चाती फुगवून पुढे आला.
सुमितः गाडीची चावि..
नियंत्रकः एवढा राग कसला येतोय रे ?
सुमितःमाझा चेहरा आणि माझा नाव लकशात ठेवा. मी परत भेटेन तुम्हाला.
मी तुम्हा अगोदरच संगितला कि सुमित फार करेक्ट आणि मानी माणूस आहे. त्या दिवसा पासून त्याने प्रशासकीय सेवेत जायचा चंग बानधला. आणि आता लवकरच तो रुजू होइल. ही घटना तरी ४-५ वरषापुर्वीची आहे. पण तो अजून ती लक्शात ठेवून आहे.