म्हणींमध्ये दोन घडे व्यवस्थित आठवतात...एक पापाचा आणि हा नमनाचा.
चिपटे, मापटे, अधुली, पायली ऐकले आहे... धडा या मापाबद्दल ऐकले नाही. पण जर का तसे माप असेल तर तो शब्द वापरणे चुकिचे ठरणार नाही.
पण धडा माप जरी असले तरीसुद्धा "घडाभर" या शब्दाने प्रस्तावनेतली अतिशयोक्ती व्यक्त होते. त्यामुळे "धडा" हे माप असो अथवा नसो "घडाभर" हे संयुक्तिक आहे असे वाटते.
पण हे माझे "असंशोधित" (म्हणजे, संशोधन न करता आलेले/केलेले/लिहिलेले)(अरे बापरे! कितीतरी लेले!) विचार आहेत.