'धडा' हे माप मीही ऐकले नाही. पण जर कोणी लेखकाने त्याचा उल्लेख केला असेल तर असेलही. आणि ते आकाराने नक्कीच लहान असणार.

भलीथोरली, लांबलचक, कंटाळवाणी प्रस्तावना असेल तर नमनाला 'धडा' ऐवजी 'घडाभर' तेल झाले असा, उच्चारसाधर्म्य पण आकारात बरीच तफावत दर्शविणारा शब्दप्रयोग, विनोद निर्मितीसाठी, करीत असावेत.