भारतीय आणि मराठी गणिती दत्तात्रय कापरेकर यांनी एक आकडा शोधून काधला होता. त्याची पण अशीच गंमत होते.

कापरेकरांचा आकडा आहे ६१७४.

१. कोणत्याही ४ आकडी संख्येपासून सुरुवात करा.

उदा. ३७४३

२. या संख्येमधल्या अंकांची अशी पुनऱ्मांडणी करा की त्यातून एक मोठी आणि एक छोटी संख्या तयार होईल.

मोठी संख्या = ७४३३
छोटी संख्या = ३३४७

३. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा.

७४३३-३३४७ = ४०८६

४. तिसरी स्टेप पुन्हा पुन्हा करत रहा.

८६४० - ०४६८ = ८१७२
८७२१ - १२७८ = ७४४३
७४४३ - ३४४७ = ३९९६
९९६३ - ३६९९ = ६२६४
६६४२ - २४६६ = ४१७६
७६४१ - १४६७ = ६१७४

५. कोणत्याही ४ आकडी संख्येपासून सुरुवात केली तरी शेवटी ६१७४ हाच आकडा मिळतो.
६. जास्तीत जास्त ७ वेळा अशी वजाबाकी करावी लागते.

कापरेकरांनी हा शोध १९४६ मध्ये लावला. कापरेकरांचं सर्व आयुष्य अतिशय खडतर परिस्थितीमध्ये गेलं. एक शाळामास्तर म्हणून त्यांनी आपली हयात वेचली. त्यांच्याबद्दल अजून माहिती हवी असल्यास हा दुवा बघा.