होय, गुडूची निश्चित ज्वरघ्न आहे. गुळ्वेल सत्व, गुडूची घन वटी इ औषधांमधून गुळवेल उपलब्ध आहे. फ्लू साठी मात्र गुग्गुळ , त्रिफला, त्रिकटू, काडे चिराईत असणारी औषधे जास्त उपकारक ठरतात. त्रिफळा गुग्गुळ आणि तिक्त पंचक क्वाथ हे मिश्रण फ्लू प्रतिबंधार्थ उपयुक्त ठरेल.. गुग्गुळाची ख्याती संधीगत विकारांमध्ये जास्त असली तरी त्याची ज्वर आणि शोथामधील उपयुक्ततता दुर्लक्षिता येणार नाही...