मनोगत हे संकेतस्थळ वय, क्षेत्र याच्या मर्यादांमध्ये बंदिस्त नसून 'मराठी' असलेल्या / आवडणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेणारे आहे.
ही बाब अत्यंत महत्त्वाची वाटते.
मी येथे नवीन आहे, मात्र अनेक चर्चा, गद्यसाहित्य यातून अनेक ज्ञानवर्धक गोष्टी मिळाल्या. एकाहून एक अशा सरस कविता वाचायला मिळाल्या.
अनेक सदस्यांनी आपापली मते मांडताना काही इतरत्र असलेले दुवेही दिले. तेही मिळाले.
मनोगतचे मुखपृष्ट सुंदर आहे. सर्व विभाग सहज पोचता येण्यासारखे आहेत.
वैयक्तिकरीत्या, मला माझ्या कविता / काही साहित्य / प्रतिसाद येथे छापायची संधी मिळून 'नोन' व्हायचे माझे ध्येय बरेच जवळ आणता आले.
मी स्थळाचे निर्माते, प्रशासक, वाचक, कवी, लेखक, चर्चा प्रस्ताव/ पाककृती देणारे व माझे प्रतिसादक / वाचक या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
याच सर्वांना व विशेषतः निर्माते व प्रशासक यांना शुभेच्छा देतो की सहाव्य वर्षात यशस्वी पदार्पण तर केलेच आहे पण अजून अनेक दशके मराठी माणसाला व्यक्त होण्याची संधी आपण देत राहावीत व मराठी भाषेला असेच सहाय्य करत राहावेत.
धन्यवाद!