गरम दुधाचे माहित नाही पण गरम पाण्यात मात्र मध घालतात आणि घसा खवखवत असेल तर गरम पाणी आणि मध हे मिश्रण घेतात.
अजून एक गोष्ट म्हणजे, मिरी दालचिनी वगैरे घालणे बरोबर आहे-- आमच्या शेजारी प्रभू (कारवारी) राहत होते त्यांच्या घरी हे पेय करत त्याला ते 'कशाय' म्हणत. ते मात्र त्यात मध न घालता गुळ घालत असत. कशाय शब्दापासुनच CUP ला कशायपात्र नाव पडले असेल का?