लेख फार फार आवडला. आपले हे खालील मत!

'नाटका - सिनेमात ज्याची चलती आहे तो नट, म्हणजे लौकिकार्थाने जो हीरो तो नट आणि बाकी सारे 'बोलट'' या भिकार कोटीचा पहिला बळी जनार्दन नारो शिंगणापूरकर असेल, पण असे सगळे तिसऱ्या चौथ्या रांगेतले बोलट काही जनार्दन नारोइतके भिकार असतात, असे नाही. त्यातले काही बोलट हे त्या नटांना खाऊन टाकतील इतके सामर्थ्यवान असतात; पण नाटका-सिनेमाची दुनिया अशी विचित्र आहे की जिथे प्रसंगी नवीन निश्चल, अनिल धवन, विक्रम, विजयेंद्र घाटगे, सचिन पिळगावकर असले नट चालून जातात.

१. अनेकदा असे नट चालून जाण्याचे कारण ते मूळ हिरोपेक्षा दर्जेदार असू शकतात किंवा त्यांना किशोरकुमार सारखा आवाज व उत्तम संगीत दिग्दर्शक मिळू शकतो. जसे नवीन निश्चलचे - रातकली इक ख्वॉबमे आयी!

२. अनिल धवन या चमत्कारिक नटाला करार झाल्यानंतर त्याच्या 'अभूतपुर्व अभिनयामुळे' एका चित्रपटाच्या नियमावलीप्रमाणे 'काढून टाकण्यासाठी' जे पैसे निर्मात्याला द्यावे लागले असते ते परवडत नव्हते म्हणून त्याला त्या चित्रपटात घेतला होता.

३. सचिन पिळगावकर - मी एवढेच म्हणू शकतो की या जगात कुणी असावे व कुणी नसावे यावर कुणाचेही बंधन नाही ही अत्यंत घृणास्पद बाब आहे.