केके मेननची खास 'प्राव' शैलीतली ओळख आवडली. पण 'ती' कोटी केकेवर वापरावी असे मुळीच वाटत नाही.
त्याला कोणत्याही भूमिकेत पाहिले की एक गंभीर सूर लागतो. त्याने तसे 'टाईपकास्ट' होऊ नये.दिग्दर्शकांची आणि निर्मात्यांची हीच वाईट खोड आहे. एका नटाच्या एखाद्या प्रकारच्या भूमिका लोकांना आवडतात म्हटले की तसल्याच भूमिका घेऊन ते दाराशी उभे राहतात. अर्थार्जन हा व्यावसायिकतेचा मुख्य मुद्दा आहे हे मान्य केले तरी त्याने त्याच-तशाच भूमिका पुन्हापुन्हा स्विकारू नयेत असे वाटते.
त्याला आणखी बहुढंगी भूमिका मिळाव्यात (विनोदी वगैरे) आणि त्याचा अभिनय चहूअंगांनी फुलून यावा अशी मनोमन इच्छा आहे.
(अवांतर - फोटो डकवताना थोडासा लांबोळका झालेला वाटतो.)