आपले सकाळबद्दल्चे मत वाचले. त्यात सकाळबद्दलचा तिरस्कार दिसून येतो. पण सकाळला निर्बुध्ध म्हणण्याचे काही कारण असावे
असे मला वाटत नाही. एखाद्या लेखाने सकाळ हा निर्बुध्ध ठरत नाही. सकाळने ज्या ज्या प्रश्नाला हात घातलेला आहे ते प्रश्न सुटलेले
आहेत.
दुसरी एक गोष्ट आपण ध्यानात घेतली नाही. की पुण्यात एवढी दैनिके आली. किंबहुना दैनिकांचा "पुरच "आला असे म्हणता येईल.
पण या पुरात " सकाळ " कधीच वाहून गेला नाही किंवा नामशेष झालेला नाही. याचे कारण "सकाळ " निर्बुध्ध आहे का ?
का सकाळ वाचणारे " निर्बुध्ध " आहेत. एवढी ढिगभर दैनिके आली तरी सकाळचा खप कमी झालेला दिसत नाही. यावरुनच
सकाळची योग्यता समजते. केवळ एका लेखावरून सकाळ निर्बुध्ध आहे असा निष्कर्ष काढणे "निर्बुध्ध्पणाचे "ठरेल असे मला वाटते
हवे तर सकाळची तुलना अन्य दैनिकांशी करून बघा