माझा मांजर आडवे जाण्याबाबतचा अनुभव अगदीच वेगळा आहे.
लहान असताना "मांजर आडवे जाणे हा अपशकून आहे" हे ऐकले होते. महत्वाच्या कामाला निघालो असताना एकदा मांजर आडवे गेले. म्हटलं आता काम होणं अशक्य..!! परंतु झाले भलतेच, माझे काम लगेच झाले.
तेंव्हापासून आता जर का मांजर आडवे गेले तर मला अगदी आनंद होतो कारण आता मांजर आडवे जाणे हा माझ्यासाठी शुभशकून झाला आहे. कदाचित, त्या दिवशी पळत जाऊन मांजराला आडवे जाऊ दिले नसते तर वाटले असते " बरा झाला बाबा, मांजराला आडवे जाऊ नाही दिले, नाहीतर नक्कीच काम झाले नसते".
एकंदरीत, सांगायचे असे की काम व्हायचे असेल तर होईलच अन्यथा नाही. ह्यात, ते मांजर जे बिचारे आपल्या मार्गाने चालले आहे त्याचा काय दोष?