श्री. कमलाकर
सर्वप्रथम मधुमेह काबूत आणल्याबद्दल अभिनंदन.
मला काही प्रश्न आहेत. जितकी उत्तरे जाहीर देणे योग्य समजाल तितकी द्यावीत ही विनंती.
१. आपले साखरेचे आकडे फास्टिंग की जेवल्यावर दोन तासांचे?
२. आपण १ तास कुठल्या प्रकारचा व्यायाम करता?आपली व्यायामशाळा भारतीय पद्धतीची (तालीम) की पाश्चात्य पद्धतीची?
३. हे थोडे अवघड आहे. पण आपल्या मते आपली साखर सामान्य पातळीवर येण्यास व्यायाम आणि औषधे सारखीच कारणीभूत आहेत का? (तुम्ही अजूनही औषधे घेता असे समजून विचारले आहे. बंद केली असलीत तर उत्तर आधीच मिळाले. )
एक तर थोडीशी खाजगी माहिती आपण जाहीर केलीच आहे. थोडी आणखी जाहीर केलीत तर माझ्यासारख्या अनेकांना फायदा होईल असे वाटते.
धन्यवाद.
विनायक