आज मला चार वर्षे झाली आहेत. मी रोज एक तास व्यायाम करतो. मला एक दिवस व्यायाम केला नाही तर चुकल्यासारखे वाटते. व्यायामामुळे तुमच्या शरीरात ताकद येते. लवचिकपणा येतो. तुम्ही आनंदी व समाधानी राहता. मनांत वाईट विचार येत नाहीत. माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण आता नॉर्मल म्हणजे १२५एमजी/ ग्रॅम इतके कायम टिकले आहे.
वाचून अतिशय आनंद झाला. आपला निश्चय असाच टिको आणि आपले आरोग्य उत्तम राहो अशा माझ्यातर्फे शुभेच्छा.
तुमचे उदाहरण वाचून चांगला बोध मिळत आहे.
असेच म्हणतो. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करायला सुरवात करणे ही मार्क ट्वेन म्हणतो त्याप्रमाणे सिगारेट सोडण्याइतकी सोपी गोष्ट आहे; माणूस ती कितीही वेळा करू शकतो!
अवांतरः मधुमेहावर आणि तदानुषंगिक गुंतागुंतींवर आयुर्वेद रसशाळेच्या 'असनाद' या गोळ्या प्रभावी आहेत. मधुमेहाच्या इतर औषधांप्रमाणेच त्या कायम घ्याव्या लागतात, पण त्या सौम्य आहेत; त्यामुळे 'हायपो' ची वगैरे भीती नाही. अर्थात कोणतेही औषध वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे, हे उत्तम.