काही बाबी पटल्या नाहीत तरी मला तर सकाळ च पेपर आवडतो बुआ. अगदी चुकल्या चुकल्या सारखे वाटते नाही मिळाला तर. बाहेरगावी गेले तर फारच पंचाईत होते... त्याचा तो ठराविक फाँट, ऱ्हस्व दीर्घाच्या चुका नसलेला मजकूर, विविधरंगी बातम्या यांची अगदी सवय जडलेली आहे. सकाळ च मनामनात घर करून राहिलेला पुणेकरांचा अगदी आवडता पेपर आहे यात संशय नाही.
आणि व्यापारीकरण तर सगळेच पेपर्स सर्रास करतात की. "टाईम्स" काय अपवाद आहे याला? "पुणे टाईम्स" च्या बिभित्स रुपापेक्षा सकाळ कितीतरी सुसंस्कृत व सोज्ज्वळ आहे!