माझे आवडते दैनिक सकाळच आहे. याची कारणे खालिलप्रमाणे देता येतील.
१) सकाळने स्वतावर काही "बंधने "स्वताहून लादून घेतलेली आहेत.
२) दुसरी गोष्ट सकाळ आजचे "शुभांक "छापीत नाही
३)सकाळ हा "रोज १०००० रुपये कमवा" अशा जाहिराती छापीत नाही
४) सकाळमध्ये "तंबाखुजन्य "पदार्थांच्या जाहिराती नसतात.
५) सकाळने कधीही कुठलाही" सर्वे " करून आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा "डांगोरा "पिटला नाही.
६) सकाळ कधीही आपला खप वाढविण्यासाठी "रुपयात पुरवणी "असे करत नाही.
७) सकाळने "कामशास्त्र विषयक" सल्ला देण्याचा भोंगळ प्रयत्न केला नाही.
८) सकाळच्या कचेरीसमोर सकाळची टिंगलटवाळी करणारे भित्तीचित्र लागले तरीही सकाळने आपला" संयम "सोडलानाही.
मला वाटते या सर्व कारणांनी सकाळ आज सर्व "कुटुंबाचे दैनिक" असे "बिरुद" लावण्यास पात्र आहे.
म्हणून तर गेले ३२ वर्षे मी सकाळचा वाचक आहे. मला "सकाळ" सोडून अन्य दैनिकाकडे वळावेसे वाटले नाही.