मलाही खात्री वाटते की झाला प्रकार हा 'माय नेम इज् खान' या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धी करताचाच प्रयत्न आहे.

'वर्ल्ड ट्रेड सेंटर' च्या हल्ल्यानंतर शाहरुख कितीतरी वेळा अमेरिकेत गेला असावा. जेव्हा हा विषय ज्वलंत तेव्हा त्याची तपासणी नाही का झाली? मग 'खान' या नावामुळे आताच तपासणी झाली का?

ही केवळ 'सवंग प्रसिद्धी'च आहे, त्यात 'वाजवी तक्रार' असे काही नाही.

एकदा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने सुरक्षेसाठी जे काही नियम (ते किती योग्य/अयोग्य हा मुद्दा वेगळा) ठरवले त्यांचं पालन तिकडच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी जर सगळ्यांसाठी सारखाच दृष्टिकोन ठेवून केलं तर त्यात तक्रार करण्याचं कारणच काय? असंही म्हणता येईल की या कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे तिकडे पुन्हा असे दहशतवादी हल्ले झाले नाहीत. आपल्याकडे मात्र प्रसिद्ध व्यक्तींना विनाकारण सवलत दिली जाते.

त्यामुळे उगाच ओरडत बसण्यापेक्षा पुढच्या वेळी 'ब्रॅड पिट' भारतात येईल तेव्हा आपल्याकडेही त्याची अशीच तपासणी करावी.