मध्यंतरी जॅक निकोल्सन आणि टॉम क्रूज ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अ फ्यू गुड मेन' ह्यांची भ्रष्ट नक्कल हिंदीत आली होती. जॅक निकोल्सनचे काम ह्या केकेने केलेले होते. त्यातले २-३ प्रसंग बघण्याचा योग आला. पण केकेने जॅक निकोल्सनने केलेली भूमिका (जॅक निकोल्सनची नक्कल नव्हे) केली होती. बघवत नव्हती. चित्रपटच बकवास असावा. (कारण तो बऱ्याच यत्ता आणि बुके शिकला आहे असे दिसते.) बाकी केके ओकेच वाटला.  'सरकार'मधले काम छान वाटले होते (जेवढे बघितले होते तेवढे) त्याचे.  बॉलिवूड मधल्या नटव्यांपेक्षा सरसच. आता संजोप राव ह्यांनी त्याच्यावर एवढा सरस लेख लिहिला आहे. म्हणजे केके वाटतो त्यापेक्षा अधिकच सरस नट असला पाहिजे.