प्रस्ताव व काही प्रतिसाद वाचून थोडे नवल वाटत आहे.
१. सकाळचे करायचे काय - आपल्यापैकी कुणीही काहीही करू शकत नाही.
२. मुक्तपीठात अंधश्रद्धा छापणे - छापणे हा लोकशाही व वशिल्याचा दर्जा याचा परिणाम असावा. मुद्यांशी व्यवस्थापन सहमत नसते असा डिस्क्लेमरही कुठेतरी छापला जात असावा.
३. सकाळने श्रेय घेण्याचे प्रयत्न केले - एक तरी माणूस आहे का की जो आपल्याला ( आपल्याला म्हणजे वाचकांना ) प्रत्यक्ष माहीत आहे व तो केलेल्या चांगल्या गोष्टींचे श्रेय घेत नाही? (हे विधान 'अगदी अक्षरशः' अर्थाने घेऊन यादी देण्याची आवश्यकता नाही. )
४. हा आयुर्वेद म्हणजे दुकाने आहेत - असली तर असली. यावरून सकाळ निर्बुद्ध कसा? पैसे न घेता वर्तमानपत्र चालवणे अशक्य आहे.
५ - कुठले कुटुंब अभिप्रेत आहे - हा प्रश्न मला समजला नाही. पुण्यात जो एक मध्यम / उच्च मध्यम / कनिष्ठ मध्यम वर्ग आहे त्यांच्या घरांमध्ये प्रामुख्याने सकाळच येतो. कावळा अशा कुटुंबांबद्दल बोलत असतील हे मत बनणे सहज वाटते. पान टपरी, स्टेशन / स्वारगेट, चहा टपरी, एकंदर सार्वजनिक ठिकाणी पुढारी, प्रभात , लोकमत व पोलीस टाईम्स ही पत्रे प्रामुख्याने वाचली जातात. घरामध्ये सहसा सकाळ घेतला जातो हे कावळा यांचे मत पटले. मात्र, याचा अर्थ सकाळच सरस आहे असा नसणार.
६. - वर्तमानपत्र 'निर्बुद्ध' असणे म्हणजे काय ते मला समजले नाही. बुद्धिवान, ढ, मध्यम अशी वर्गवारी कशी काय करता येईल पेपरांमधे?