हा विषय तुम्ही चर्चेत टाकायला हवा होता.. खरच.. कुठे चाललो आहोत आपण..
आजकाल बॉलीवूड, सिनेस्टार, रिऍलिटी शोज ना जरा वायफळ आणि जादाच महत्त्व आले आहे.
दहावीत बोर्डात प्रथम आलेल्या मागच्या दोन्ही वर्षीच्या मुलांची नावे आठवणार नाहीत पण ऍश चे सगळे बॉय्फ्रेंडस विचारा लगेच सगळे सांगू शकतील सलमान विवेक ..(आणि अजुनही कोणी असतील तर कोण जाणे)
रघुनाथ माशेलकरांनी हळदीच्या पेटंट साठी केलेले काम कुणाला कदाचित माहितही नसेल पण बेबो च्या झीरो साईझ ची इत्यंभूत माहिती देतील..
आता ही बेबो, तिचा "क्या आप पाचवी पास से तेज है" प्रोग्रॅम पहायचे (दुर ) भाग्य आमच्या नशीबी अले तेव्हा तिची अक्कल हुशारी ही लगेच समजली.. नापास झाल्यानंतर ही मुलगी बॉलीवूड मध्ये आली आणि आज पैसे कमावते आहे.
फालतू प्रश्नांची उत्तरे देताना ती सहकलाकाराला चिकटत काय होती, हसत काय होती आणि एकही उत्तर तिला आले नाही. पण रूबाब किती..
नुसती स्टाईल मारणे हा काही जीवनाचा उद्देश नाही. स्टाईल ही आवश्यक आहेच पण अजूनही अनेक गोष्टी गरजेच्या आहेत.
ती कविता आहे ना की राजहंसाला बगळ्यात राहिल्यने स्व्तः कुरूप आहे असे वाटत होते पण नंतर त्याचा हा गैरसमज दूर झाला तसे काही मुठभर सरळ, सालस, हुशार आणि चांगले गुण असलेल्या लोकाना स्वतःकडे नीट नीरखून पाहून स्वतःचे रूप ओळखून वागायची आज गरज आली आहे.
भारताची ओळख नुसती बॉलीवूड पुरती (स्लमडॉग) न मर्यादित राहता, माहिती तंत्रज्ञाना तून व्हावी (जसे की सोनी, टोयोटा म्हटले की त्या त्या देशांची शान वाढते आज) आणि अशा कामात कार्यरत असलेल्या भारतीयाना भारतात प्रचंड महत्त्व प्राप्त व्हावे असे मनोमन वाटते.