मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहूल द्रवीड वन-डे टीममध्ये परतलाय... सगळ्या मिडीयानं त्याला डोक्यावर घेतलं कारण त्यानं कमबॅक केलंय म्हणून... अन्यथा त्याचा वाईट फॉर्म सुरू असताना त्याला शिव्यांची लाखोली याच मिडीयानं वाहिली ना? पण 'देखल्या देवा दंडवत' अशी आपली नितीच आहे, त्याला कोण काय करणार? राहूल परत आला, हे चांगलं झालं का वाईट, हे आत्ताच कसं सांगता येईल?