छान. छान. आवडले विश्लेषण, अन्वयराव.
एका अनवट ( रागाबाबत हाच शब्द का वापरायचा असतो आणि अनवट ही काय 'चीज' आहे, ते काही कळत नाही ! ) रागाचे मर्म खूप नाजूकपणे उलगडून दाखविले आहे.
विषय 'रागा'वर आधारित असला तरी प्रेमाचा आहे ! 'रागा'वर प्रेम करणाऱया अनेक माणसांपैकी मी एक होय...! गंमत सोडा; पण हे छोटेखानी विश्लेषण खरोखरच आवडले. मनापासून स्वागत...
.........
मारवा हा रागही असाच उलगडून दाखवावा, ही विनंती.
विशेषतः मारवा आणि पूरिया यांच्यातील सूक्ष्म बारकावे आपण उलगडून दाखवाल काय ? कारण सांजवेळचे हे राग खूपच आवडतात मला...वेगळीच दुनिया आहे ती !
.........
'जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले; वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले...' (गीतकार ः मंगेश पाडगावकर, संगीतकार ः विश्वनाथ मोरे, गायिका ः उषा मंगेशकर) हे गाणे मारवा या रागातीलच आहे ना ? मोरे हे एक अत्यंत गुणी संगीतकार होते. संगीतप्रेमींचे दुर्दैव हे की, ते आपल्यातून खूप लवकर निघून गेले. असो.