श्री. कावळा यांची खालील विधाने पुर्ण बरोबर नाहीत. प्रत्येक विधाना समोर त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
२) दुसरी गोष्ट सकाळ आजचे "शुभांक "छापीत नाही -- फार पुर्वी सकाळ शुभांक छापत असे.
४) सकाळमध्ये "तंबाखुजन्य "पदार्थांच्या जाहिराती नसतात. -- काही वर्षां पुर्वीपर्यंत सकाळ या प्रकारच्या जाहीराती छापत असे.
वरील दोन बाबतीत असे म्हणता येईल की, सौ चुहे खा के, बिल्ली चली हज.
५) सकाळने कधीही कुठलाही" सर्वे " करून आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा "डांगोरा "पिटला नाही. -- सकाळने सर्वे केल्याच्या जाहीराती कोल्हापुर सकाळ मध्ये आलेल्या आहेत.
६) सकाळ कधीही आपला खप वाढविण्यासाठी "रुपयात पुरवणी "असे करत नाही. -- कोल्हापुर सकाळ हा काही वर्षांपुर्वी १ रुपायांत मिळत होता, परंतु, त्याच वेळेस त्याच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याचा दर हा ३ रु. होता तसेच सकाळचा ही दर ३ रु. होता, परंतु तो व्यवसायवृद्धीसाठी १ रु. करण्यात आला होता.
७) सकाळने "कामशास्त्र विषयक" सल्ला देण्याचा भोंगळ प्रयत्न केला नाही. -- कामशास्त्र विषयक सल्ला देणे हे भोंगळपणाचे कसे ठरू शकते.