भा ज पा नक्की कोणता ? हा चर्चेचा विषय आपण निवडला , प्रथम आपले अभिनंदन! विचारा कश्या बाबत? अहो असे काय करता? तुमच्या धाडसाबद्दल!, मुळातच राजकीय वैचारिक लोकांनी ह्या पक्षाशी काडीमोड केलेली , आणि तुम्ही त्या बद्दल लिहताय म्हणजे तुमच अभिनंदन करायला नको का? म्हणून अभिनंदन!, असो........
पुर्वीच्या काळी प्रत्येक पक्षाची एक मक्तेदारी एका नेत्या कडे होती, तो नेता, त्या नेत्याचे विचार म्हणजे त्या पक्षाचे विचार हे
मानन्याचा काळ बहुता संपलाच असे म्हणायला हरकत नसावी, वानगी दाखल आपल्या आजुबाजुला पाहिले तर प्रादेशिक पक्षांपासुन, राष्ट्रीय पक्षांमध्ये हाच प्रकार आहे. ह्या राजकीय पक्षांमुळे एका घरात दोन तीन विचारांचे प्रवाह चालू झाले. सगळे आपमतलबी म्हणजे राजकारणी
असा माझा ठाम समज आहे