व्यायामशाळेवरून माझाच एक जुना विनोद आठवला.
मी एकदा माझ्या मित्राच्या व्यायामशाळेत गेलो. मी दिसायला अगदी काडी आहे दिसायला. आमचा संवाद :-
मी :- का रे याची महिना फी किती ?
तो :- इतरांसाठी १५० रु. पण तुला १०० रु.
मी :- मग मी उद्यापासुनच येतो.
तो :- तुला १०० रु मी देणार ...
मी :- मग आत्ताच सुरू करतो.
तो :-१०० रु. तुला येण्यासाठी नाही तर न येण्यासाठी मी देईन..... नाहीतर तुला बघून बाकीचे विचार करतील की माझ्या व्यायामशाळेत व्यायाम केल्याने असे होतात

असो. आता मीही रोज (१५ दिवसांपासून) नियमित व्यायामशाळा सुरू केली आहे. आणि पोहणे शिकायला सुद्धा जात आहे. तेंव्हापासून मरगळ निघून गेली आहे. अभ्यासात अधिक एकाग्रता येत आहे.

अवांतर :- मधुमेहाची चाचणी ६० नंतरच करावी लागते का? त्याची लक्षणे कोणती ? दुवा दिल्यास उत्तमच...

@ कुशाग्र :- सुदर्शन क्रियेसाठी एखादा व्हिडीओ दुवा मिळेल का? किंवा दक्षिण कोरीयाला कुठे शिकता येईल का? धन्यवाद.

तुमच्या आरोग्यासाठी  खूप खूप शुभेच्छा...