बोथटच होत चालल्या आहेत हल्ली.
"जीवो जीवस्य जीवनम् " हे वाक्य एखाद्या सभेत बोलायला जरी शेलकं वाटत असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा हादरवून टाकणारा आहे.
गो. नि. दां च्या कोण्या एकाची भ्रमणगाथा- मध्येही याच स्वरूपाचा एक प्रसंग आहे, कोणता तो सांगत नाही, कारण तो वाचवतही नव्हता मला. पण त्यात शेवट एक वाक्य आहे गोनिदांचं, 'माझ्या दुबळ्या देहाची मला खूप लाज वाटली'. आपण फक्त हे सगळं बघतो, नाइलाजानं. करत काहीच नाही, करू काहीच शकत नाही.