तुमचे विश्लेषण आवडले.
प्रदीपजी म्हणतात तसा मीही रागावर प्रेम करणाऱ्यातला एक आहे.
गाण्यांचे राग फारसे कळत नाहीत, मित्रांकडून वगैरे मिळालेल्या माहितीनुसार, राग आणि त्या रागावरली गाणी ऐकणे एवढेच जमते.
पण तुमचा लेख वाचून, माझ्याकडचा यशवंतबुवा जोशी यांचा पटदीप आणि किशोरीताईंचा पटबिहाग ऐकला.
दोन्हीमधून 'मर्मबंधातली ठेव ही' ह्या गाण्याची सुरावट स्पष्ट जाणवत होती. खूप छान वाटले.
प्रदीपजींनी उल्लेखलेले मारवा आणि पूरिया हे राग मला बरेच सारखे वाटतात. त्या रागांना तो संध्याकाळचा इफेक्ट देणारा एखादा स्वर दोन्ही रागांमध्ये कॉमन असेल यात शंका नाही.
असेच लिहीत रहा, आणि आम्हाला रागांचा अजून परिचय करून द्या.