पांच वर्षाचा  हा  काळ लोटला
"मनोगत" चा,  वृक्ष  बहरला
अनेक शाखा  वृक्षास फुटल्या
करती  विस्तार परिने आपुल्या

वाढेल मनोगताचा वृक्ष निकोप
घातले त्यास, खत पाणी मोप
आदर,आगत्य,  यांचा मिलाप
घडेल बदल चांगला आपोआप

वाचावयास नवकवींचे अविष्कार
अन मिळे लेखकांचे आत्मविचार
वृक्षाचे व्हावे हो वटवृक्षात रुपांतर
शुभेच्छा देती कमलाकर दिवाकर